वसंत ग्रूप आणि संकल्प तरु फौंडेशनच्या वतीने एक लाख झाडे लावण्याचा संकल्प
मावळ मराठा न्युज :-पिंपरी(प्रतिनिधी) चिंचवड येथील वसंत ग्रुप आणि संकल्प तरु फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहिती वसंत ग्रुपचे संचालक अनिल मित्तल यांनी दिली. पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ रोजी शिवाजीनगर पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारामध्ये सुमारे १००० झाडे लावणारा असून या एक लाख वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. वसंत ग्रुप गेली २१ वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे वसंत ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आले आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे, अनाथ विद्यार्थ्यांना कपडे व चादरी वाटप करणे,खाद्यपदार्थ वाटप करणे,नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर घेणे, नेत्रहीन नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिरे घेणे अशी अनेक सामाजिक कार्य केले.तसेच कोरोना काळात ३०० रेमिडीसीवर इंजेक्शन मोफत वाटले गरजूंना जेवण आणि कृत्रिम व्हेंटिलेटरची सेवा मोफत उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. पिंपरी- चिंचवड पुणे परिसरातील मोकळ्या जमिनीमध्ये हरितक्रांती घडावी, या हेतूने एक लाख झाडे लावण्याचा संकल्प वसंत समूहाने केला आहे.