अग्रसेन ट्रस्ट आणि जानकी वुमेन्स वेलफेयर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने नेत्र तपासणी शिबीर
मावळ मराठा न्युज :-पिंपरी,(प्रतिनिधी) श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड – प्राधिकरण आणि जानकी वुमेन्स वेलफेयर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील श्री अग्रसेन भवन मध्ये नेत्ररोग तथा मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरा मध्ये अंदाजे 100 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 40 रुग्णास मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले.या ४० रुग्णांवर करण्यात येणार असलेल्या शस्त्रक्रिया क्रिसला डेव्हलपर्स आणि आयुर्वेद रुग्णालय यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथि माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलअग्रवाल, मेडिकल कमिटी अध्यक्ष विनोद बंसल, जानकी देवी ट्रस्टचे ओमप्रकाश अग्रवाल, सागर अग्रवाल , आयुर्वेद रुग्णालयाचे डॉ.चंदना विरकर, डॉ. संदीप दारुंडे, डॉ. मनिषा पिंगळे, डॉ. सुखदा कुलकर्णी , अनुप मोरे, ईश्वर अग्रवाल, डॉ. रामप्रसाद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. रमेश बंसल, डॉ. संतोष अग्रवाल आणि श्री अग्रसेन ट्रस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमचे विशेष सहकार्य लाभले.