वलवन नांगरगाव येथील पुल नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करा,लोणावळा शहर शिवसेनेची मागणी




मावळ मराठा न्यूज़:- लोणावला,वलवण व नांगरगावला जोडला जाणाऱ्या पुलाचे काम संथ गतीने चालू आहे.याचा स्थानिक नांगरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिनांक ८ जून रोजी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने सदर पुलाची पाहणी करण्यात आली व संबधित पी डब्लू डी अधिकारी श्री राठोड साहेब व ठेकेदार यांना संपर्क केला असता त्यांनी पाच ते सहा दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती दिली.यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, महिला आघाडी शहर संघटिका मनीषा भांगरे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, उपशहर अधिकारी आतिष भांगरे, विभागप्रमुख प्रमोद लोयरे, रुपेश नांदवटे, सुधांशु शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.