गेनबा सोपानराव मोझे अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर चा मेळावा उत्साहात संपन्न

वडमुखवाडी , पुणे-(बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर) २००६ -०८ या डीएडच्या बॅचच्या माजी विद्यार्थी १६ वर्षानंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकांसोबत गेट-टुगेदर साजरे केले अशी माहिती डीएड माजी विद्यार्थ्यांच्या बॅटचे सदस्य व आयोजक श्री मंगेश कुंभार यांनी दिली हल्लीचं जगणं कसं ट्रेसफुल, स्पीडफुल झालेलं असतानाही सर्वांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली या बॅचला अध्यापन करणारे आदरणीय हिंगे सर, यादव सर ,सोनवलकर मॅडम, तांबोळी सर ,पासलकर सर ,शेंडगे मॅडम, ठुबे मॅडम, शेंडे मॅडम ,शेरखाने मॅडम व डि.एड महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाबळे मॅडम उपस्थित होत्या. आपले पद पैसा प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले . त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेट-टुगेदर च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये एपीआय महेश लामखेडे डॉ.मंगेश कुंभार डॉ.रविचंद्र ढवळे पो.कॉन्स्टेबल अंकुश राठोड मंत्रालय सहाय्यक शरद पोकळे ,मंदार जाधव , हनुमंत तरटे, संदीप मगर ,राहुल दिघे ,रवींद्र पानसंबळ, अनिल जायभाय, सुधीर घुमरे ,अरुण भिसे, संतोष खोमणे ,शिवाजी गुंजाळ, शामल तांबे अनुजा गायकवाड मॅडम आदि शिक्षक तर संदीप पोरे अनिल मुळे ,प्रतीक्षा कोकीळ, भोसले मॅडम, गीतांजली खटके, संतोष फंड ,माऊली शेळके इत्यादी उद्योजक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील अनेक विद्यार्थी पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग ,महसूल विभाग, सहकार विभाग, पशुसंवर्धन विभाग, महानगरपालिका ,शेती विभाग, व्यापार व व्यवसाय अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. हे सर्व माजी विद्यार्थी कोल्हापूर जळगाव परभणी बीड लातूर नांदेड नगर पुणे या भागातून आलेले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us