दिघीमध्ये उद्यान उभारा अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांच्याकडे मानवी हक्क संरक्षण,जागृतीची मागणी



मावळ मराठा न्यूज़ :-पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मधील दिघी हे अत्यंत महत्त्वाचे आहे उपनगर आहे .दिघीमध्ये नागरीकांसाठी कोणतेही वीरंगुळा किंवा करमणुकीचे साधन उपलब्ध नाही. मुलांसाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता आहे. अनेक वर्षापासून दिघीच्या दत्त डोंगरावर जेष्ठ नागरिक, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे तरुण या ठिकाणी सकाळी – संध्याकाळी व्यायामासाठी येत असतात परंतु काही दिवसापासून आर्मी अथाँरिटीने सकाळी –संध्याकाळी दत्तडोंगरावर जाण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध केला आहे. दत्तडोंगर आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे दिघीकर नागरीकाबरोबरच ,आर्मी, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे. पालिकेने आपल्या आरक्षित केलेल्या जागेवर सर्व सुख सोयींनीयुक्त असे सुसज्ज उद्यान उभारावे यामध्ये ओपन जिम, सह उद्यानाची निर्मिती करावी. उद्यानामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे मत मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी आयुक्तांना बरोबर चर्चा करताना म्हटले आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे म्हणाले मी आरक्षित जागेची माहिती घेऊन ताबडतोब कार्यवाही करतो आमच्या निवेदनावर त्यांनी कार्यवाही करा म्हणून शेरा मारला आहे असे जोगदंड म्हणाले आमची सकारात्मक चर्चा झाली.यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वीर,गजानन धाराशिवकर ,पंडीत वनस्कर,बळवंत काळे, ऋषिकेश जाधव, अंकुश मुळे, विजय श्रीनाथ, अनिल सिंग, सागर थिटे, दीपक चव्हाण उपस्थित होते.