पिंपरीचिंचवड शहर मातंग समाजाची बैठक उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्युज :-पिंपरी, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज अध्यक्ष नेते संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली सा लो डॉ आण्णा भाऊ साठे स्मारक निगडी या ठिकाणी मातंग समाजाची बैठक पार पडली. सर्व प्रथम आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व सा लो डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष आण्णासाहेब कसबे व नेते संदिपान झोंबाडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच ६जुन२०२४रोजी काढण्यात आलेला मोर्चा यशस्वी झाल्याने तसेच पोलिस प्रशासन व पत्रकार बांधव यांनी केलेल्या सहकार्या बद्दल अभिनंदनाचा ठराव कोअर कमिटी सदस्य चंद्रकांत दादा लोंढे यांनी मांडला त्या ठरावाला कोअर कमिटी सदस्य डी पी खंडाळे व रामदास कांबळे यांनी अनुमोदन देऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.दरम्यान पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज अध्यक्ष नेते संदिपान झोंबाडे यांनी सर्व समाज बांधवांचे आभार मानले व दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनचा सन्मान करण्याची घोषणा करून भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभेत संघटनात्मक बांधणी करणार असल्याचे सुचविले याला सर्वानुमते संमती देण्यात आली.तसेच निगडी येथील समाज बांधव स्वत्निल वाघमारे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने केक कापून नेते संदिपान झोंबाडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज अध्यक्ष नेते संदिपान झोंबाडे, सा लो डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे,कोअर कमिटी सदस्य चंद्रकांत दादा लोंढे, मयुर जाधव,डी पी खंडाळे, रामदास कांबळे, लोकसेवक युवराजदाखले, उद्योजक अनिल गायकवाड यांच्यासह अबाजी भवाळ, वसंत वावरे, गणेश कलवले, मंगेश डाकोरे, सुरज कसबे,सतिश कांबळे, संतोष रनसिंग, मोहन भिसे, पंडू कसबे, अविनाश लोणारे, महादेव वैरागे, पिंटु वाघमारे,संपत (आबा) मांढरे, अविनाश लोणारे, अंकुश देडे सतीश वाघमारे, राजेंद्र भालके, स्वप्निल वाघमारे, विकास रणदिवे , आर. एन. कांबळे,आदी प्रमुख समाज बांधव उपस्थित होते.