आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन,लोणावळा यांच्या वतीने विविध प्रकारच्या ५०० झाडांचे वाटप




मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळ्यातील आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात, सध्या पर्यावरण चा ऱ्हास होत असताना कधीही पाऊस,उष्णतेचा वाढता उचाँक ही पर्यावरण साठी धोक्याची घंटा आहे. पर्यावरणाचा कुठेतरी समतोल राखला जावा या सामाजिक हेतूने आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन च्या संचालिका यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन लोणावळा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक,भाजी मार्केट येथे झाडे वाटप समारंभ नुकताच संपन्न झाला. यात श्री महादेव नर्सरीचे दिलीपभाई देवडा,राधे वल्लभ नर्सरीचे सोमनाथ पाटील,अंगारक नर्सरीचे भारत पाटील,सार्थक नर्सरीचे प्रविण राक्षे,मयुरी नर्सरीच्या संचालिका मयुरी ताई बोत्रे यांनी विशेष सहकार्य करून आपला सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रम मयुरीताई बोत्रे,संचालिका,अनिल सुर्यवंशी, सचिव कुणाल कालेकर,अध्यक्ष लोणावळा,दर्शन गायकवाड सहसचिव हरिश्चंद्र गायकवाड सल्लागार, सौ. निकिता दिघे,सहसल्लागार,तन्वी गायकवाड कार्यकारीणी सदस्य,अभय तिकोणे यांनी आयोजित केला.तसेच या कार्यक्रमास उदयोजक सागर मोरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी ५०० हुन अधिक झाडांचे वाटप करण्यात आले.