संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटात झळकणार धनश्री घोडे



मराठा न्युज :- पिंपरी,(प्रतिनिधी) मराठा आंदोलनावर आधारीत सोनाई फिल्म क्रिएशन्स निर्मित शिवाजी दोलताडे दिग्दर्शित “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून उदयोन्मुख अभिनेत्री धनश्री घोडे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या 14 जून रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. धनश्रीने “अस्थीरवाशी” हा लघुपट, “मी खानदानी पोरगी हाय” हा अल्बम सॉंग, “बायको नंबर-१, “जावई जोमात- सासरे कोमात” या व्यवसायिक नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहे. शिवाय ती बियुटीकॉस्मॉलॉजी मध्ये डिप्लोमा केला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी केलेले आंदोलन आणि त्यामागील केलेला संघर्ष अशी या चित्रपटाची कहाणी आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेत रोहन पाटील आहे. शिवाय या चित्रपटात मोहन जोशी, सागर कारंडे, सुरभी हांडे,संदीप पाठक,अरबाज शेख, माधवी जुवेकर,विनीत बोंडे, सुनील गोडबोले, संजय कुलकर्णी,सोमनाथ अवघडे, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले अशा तगड्या कलाकारांचा अभिनय पहायला मिळणार आहे.