लोणावळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भ्रष्टाचार मुक्त भारताचा संकल्प करुन स्वाक्षरी मोहिमेने साजरी




मावळ मराठा न्युज :-लोणावळा, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली व सर्वांनी स्वाक्षरी द्वारे भ्रष्टाचार मुक्त भारताचा संकल्प करुन सुशासन दिन साजरा करण्यात आला . यावेळी लोणावळा शहर भाजप अध्यक्ष अरुण लाड यांचेसह भाजप पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.




