शिवणे येथिल मंडल महिला अधिकारीला लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
मावळ मराठा न्यूज – (शिल्पा राहुल भुंडे हिसकडून) सोन्याची खाण असलेल्या मावळ तालुक्यात लाच खोरीचे ग्रहण काही सुटेना. संगिता राजेंद्र शेरकर (मंडळअधिकारी,शिवणे) (वय ५४ रा तळेगाव दाभाडे)तसेच खाजगी व्यक्ती यांनी ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २०,००० रु लाच स्विकारताना आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंध-विभाग पुणे यांनी सापळा रचुन धडक कारवाई केली असता , लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांनी २०१९ मध्ये भडवली येथील जमिन खरेदी केली असता त्या जमिनीची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी लाच मागितली होती. तक्रारदार यांनी त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत आपली तक्रार नोंदवली होती.लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे पोलिस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळअधिकारी यांना अटक केली.