*अॅस्पायर फाऊंडेशन, नाशिक आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, २०२६ प्रा. धनराज पाटील यांना प्रदान*

मावळ मराठा न्यूज – नाशिक,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक प्रा. धनराज पाटील यांना अॅस्पायर फाऊंडेशन, नाशिक आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि.१८/१०/२०२६ रोजी अॅस्पायर फाऊंडेशचे विश्वस्त यांच्या हस्ते संजीवनी ए.सी. बॅक्वेट हॉल अॅन्ड लॉन्स, नांदूर नाका, नाशिक येथे मोठया उत्साहाने पार पडलेल्या सोहळयात प्रा. धनराज पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करणे हे अॅस्पायर फाऊंडेशन, नाशिक यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.ग्रामीण भागातील गरजू व होतकरू मुला-मुलींच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्ती व संस्था मार्फत आर्थिक मदत मिळवून देऊन याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या १७ वर्षाच्या अखंडीत सामाजिक उपक्रमाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांमार्फत समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून समाजसेवा करणे या प्रा. धनराज पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची विशेष दखल अॅस्पायर फाऊंडेशन, नाशिक यांनी घेऊन त्यांना हा पुरस्काराने गौरवण्यात आले.या गौरवा बद्दल लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष नंदकुमार वाळुंज, सचिव ॲड. निलिमाताई खिरे मॅडम, खजिनदार दत्तात्रय येवले, C.D.C. मेंबर्स डॉ. दिगंबर दरेकर सर, विश्वस्त विशालजी पाडाळे, मावळ नागरिकचे मुख्य संपादक ॲड. संजयजी पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेद्र देशमुख सर यांनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी प्रा. पाटील यांचे अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page