लोणावळा नगरपरिषदेच्या आवारातील राष्ट्रपुरुषांचे पुतळे फक्त जयंती आणि राजकारणपुरतेच उरलेत; लोणावळा नगरपरिषदेकडे त्यांना दररोज हार घालण्या इतकेही पैसे नाहीत का ?

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरुषांचे पुतळे बसवले आहेत.उद्या दसरा आहे परंतु तरी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना दररोज हार घालावा एवढे देखील पैसे नाहीत का असा प्रश्न निर्माण होतो आहे.राष्ट्रपुरुषांची आठवण आणि अस्तित्व फक्त जयंती,सणाच्या दिवशीच आणि निवडणुकीपुरतेच उरले आहे. कोट्यावधीचा उलाढाल असलेल्या लोणावळा नगरपरिषदेने निदान आपल्या आवारातील राष्ट्रपुरुषांचा तरी सन्मान करावा एवढीच माफक अपेक्षा लोणावळेकरांच्या आहेत.जवळच महाराष्टाचा श्वास,आन,मान आणि शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आहे. त्यांना देखील हार घालण्याची आर्थिक क्षमता लोणावळा नगरपरिषदेची नाही का असा सवाल सामान्य लोणावळकरांना पडत आहे. आता उद्या दसरा आहे, साडेतीन मुहूर्ता पैकी एक. हिंदू धर्माचा मोठा सण.पण राष्टपुरुष यांना हार घातले जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे.लोणावळा नगरपरिषद असा वायफळ खर्च करत असते तर निदान लोणावळा नगरपरिषद आपल्या आवारात असणाऱ्या राष्ट्रपुरुषांचा तरी हार घालून आणि स्वच्छता राखून सन्मान करावा ही अपेक्षा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page