कलापिनी तळेगांव “लायन्स नानानानीपार्क हास्यसंघ”–यांचा आठवा वर्धापन दिन थाटात साजरा!
मावळ मराठा न्यूज ,तळेगांव, लायन डॉक्टर विजया भंडारी दादा दादी पार्क स्थित सौ पुष्पावती बवले सभागृहात या हास्य संघाचा आठवा वर्धापन दिन दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला! मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानंतर हास्यसंघाचे योगागुरु श्री अशोक जी बकरेसरांनी आपल्या हास्य संघांच्या सभासदांच्या सह मान्यवरांचे श्रीफल गुलाब पुष्प देऊन स्वागत केले- त्यात कलापिनिमचे सर्वेसर्वा डॉक्टर आनंद परांजपे ज्येष्ठ साहित्यिक वक्ते लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी- महाराष्ट्र महसूल खात्यातील निवृत्त अधिकारी– श्री रामभाऊ माने श्री प्रकाश घोणे व मोरेश्वर होनप काका यां सन्माननीय पाहुण्यांचा समावेश होता! श्री प्रकाश घोणे सरांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या! श्री राम भाऊ मानेसरांनी कलापिनीच्या माध्यमातून मावळ परिसरातील नवोदित कलाकारांना डॉक्टर परांजपे आणि त्यांचा सर्व सहकारी वर्ग घडवण्याचं काम जे करीत आहेत त्यां सर्वांचं मनापासून कौतुक केलं! मोरेश्वर होनप काकांनीही या हास्य संघाला शुभेच्छा दिल्यात! जवळजवळ शंभर ज्येष्ठभगिनींना बरोबर घेऊन गेले आठ वर्ष सातत्याने आपल्या कौशल्यपूर्ण कृतीने हा हास्यसंघ यशस्वीपणे चालवणाऱ्या गुरुवर्य अशोकजी बकरे सरांचा महावस्त्र समर्पित करून सर्व मान्यवरांच्या वतीने- डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी यथोचित सत्कार केला! या हास्यसंघाला संबोधित करताना डॉक्टर भंडारी म्हणाले की -बकरे सरांसारख्या अत्यंत अभ्यासू आणि निष्णात गुरूंचा सक्षम हात एखाद्याच्या खांद्यावर पडला तर त्याच्या जीवनात परिवर्तन घडतं! त्याच्या आयुष्यात निश्चितच आनंदाचा मळा फुलतो आणि त्याच्या जगण्याचं सार्थक होतं! आहारात सत्व! बोलण्यात ममत्व! आणि वागण्यात तत्त्व असेल तर- त्या जगण्याला महत्त्व प्राप्त होत!समारंभाचा समारोप करताना डॉक्टर परांजपेनी हास्ययोगाचे विविध प्रकार प्रत्यक्ष सादर करून सभागृहातील वातावरण अतिशय खेळकर केलं होतं! आयुष्याच्या या तळावर प्रत्येकाने एकातरी सामाजिक संस्थेचा सभासद होऊन जीवनातील आनंद अनुभवला पाहिजे! कारण अशाच संस्थेतून सामाजिक दायित्व फेडण्याची संधी आपल्याला प्राप्त होते हे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून डॉक्टर परांजपेनी उपस्थि ताना पटवून दिले! या मान्यवरांच्या मनोगता अगोदर हास्यसंघाच्या सभासदांनी नृत्य गायन यात सक्रिय सहभाग घेऊन सभागृहातील वातावरण अतिशय जल्लोषपूर्ण तयार केले होते! सहभागी कलाकारांची नावे खालील प्रमाणे आहेत–गणेश वंदना : वेदिका साबळे,स्वागत गीत : आशा साबळे,मंगला साखले,रत्ना कोरडे, निर्मला साळुंके.रुखमिणी डान्स : आशाजैन, आशा साबळे,उषा व विद्या शिळीमकर,उमा पासलकर,मंगला साखले, नीता खंडागळे.आई भवानी नृत्य. :- वैजयंती शेळके,उषा व विद्या शिळीमकर नीता खंडागळे, मधुमती कुलकर्णी , वर्षा लहुळकर.भारुड. : नंदीची टालेपंजाबी गीत : श्रेया साळुंके व स्नेहा.हसत जगावे गीत….मोरेश्वर होनप.पाहुणे::-महसुल अधिकारी.. रामभाऊ माने, प्रकाश घोणे व होनप काका.( सर्व नायब तहसीलदार )श्री अशोकजी बकरे सरांबरोबरच उमा पासलकर आणि उषा शिळीमकर यांनी हा समारंभ यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले!ज्येष्ठनागरिक मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर जी रेम्बोटकर यांनी हास्यसंघाला भविष्यात मंडळाचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे आपल्या शुभेच्छाच्या मनोगतात व्यक्त केले! गुरुवर्य अशोकजी बकरे सरांनी सर्वांचे आभार मानलेत! अल्पपोहारानंतर समारंभाची सांगता झाली!