कुंडेश्वर देवस्थान कडे जाणाऱ्या महिलांच्या पिकअपला अपघात,मनशक्ती केंद्रची मदत








मावळ मराठा न्युज-मावळ,११ ऑगस्ट २०२५ या दिवशी श्रावणी सोमवार असल्यामुळे पापळवाडी पाईट तालुका खेड जिल्हा पुणे येथील महिला मंडळ देवदर्शनासाठी कुंडेश्वर ला जात असताना डोंगर उतारावर गाडीचा अपघात होऊन यामध्ये बारा महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. तसेच गाडीतील इतर २० ते २२ महिला यांना दुखापत झालेली आहे.आत्ता काही रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळत आहेत.परंतु घरी आल्यानंतर त्यांना काही गरजेच्या वस्तूंची आवश्यकता आहे अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक वनाजी कोळेकर यांनी मनशक्तीचे साधक चिंतामण शिवेकर यांच्याकडे केली होती.त्यांनी ही मागणी ताबडतोब मनशक्तीचे जीवनदानी साधक अजित फापाळे यांच्याकडे कळविली.यासाठी मानेचे पट्टे, हाताचे पट्टे, कोपरासाठी हॅन्डबॅग,निकॅप असे साहित्य डॉक्टर अथर्व शिवेकर यांच्याकडे श्री राजूशेठ खंडेलवाल यांच्या सहकार्याने तातडीने पाठवले. वरील साहित्य वाटप करण्यासाठी मनशक्ती केंद्र चाकणच्या ज्येष्ठ साधक नर्मदाताई नाणेकर,उज्वला शिवेकर यांनी रुग्णांकडे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस सहभाग घेतला.



