तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित,जी एन एम- नर्सिंग स्कूलच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका सन्मान दिन मोठ्या उत्साहात संपन्न








मावळ मराठा न्युज – तळेगाव,तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित,जी एन एम- नर्सिंग स्कूलच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका सन्मान दिन -अतिशय पवित्र प्रसन्न वातावरणात संपन्न झाला! या समारंभाचे प्रमुख पाहुणे -डॉक्टर यशवंत वाघमारे- विशेष अतिथी- राजमाता वृषाली दाभाडे- संस्थेचे चेअरमन शैलेश भाई शहा आणि नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉक्टर शालिग्राम भंडारी- नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य मोनालीसा मॅडम त्यांच्या सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांसह उपस्थित होते! सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले! सन १८२० ते १९१० या प्रदीर्घ काळात नर्सिंग क्षेत्रात आपल्या सर्वार्थाने समर्पित वृत्तीने कार्यरत असणाऱ्या फ्लोरेन्स नाईट अँगल यांच्या स्मृत्ती प्रीत्यर्थ दरवर्षी १२ मे हा दिवस संपूर्ण जगात- परिचारिका सन्मान दिवस- म्हणून साजरा केला जातो! आपल्या मनोगतात उपस्थित सर्व मान्यवरांनी या अत्यंत वृद्दय समारंभात- नर्सिंग स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांच मनापासून भरभरून कौतुक केलं! याच समारंभात- गेले वर्षभर- कला क्रीडा साहित्य संस्कृतिक क्षेत्रात- विशेष प्रवीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला! हा समारंभ शंभर टक्के यशस्वी होण्यास- प्राचार्य मोनालिसा मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली! आभार प्रदर्शनानंतर – सुग्रास भोजनाने या समारंभाची सांगता झाली.



