लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्यावतीने शेल्टर होम मधील मुलाचा वाढदिवसा निमित्त नाश्ता,चॉकलेट,वेफर्स, बिस्किटे आणि फळे वाटप








मावळ मराठा न्युज-लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्यावतीने आणि क्लब अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली टीम लोणावळा सुप्रेमोने रविवार,दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षणग्राम शेल्टर होम-देवळे (बेघर मुलांसाठी एक आश्रयस्थान येथील एका गरीब मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात ला.या प्रसंगी या आश्रय स्थानातील १५० मुलांना विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नाश्ता,चॉकलेट,वेफर्स,बिस्किटे आणि फळे देण्यात आली.या उदात्त आणि उदार उपक्रमासाठी माजी अध्यक्ष ला. विश्वनाथ पुट्टोल,ला. पूनम सुतार, एमजेएफ ला. सुधीर कदम (डीसी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन), एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी इमेज बिल्डिंग) उपस्थित होते. सर्व प्रसंगी आणि उदात्त उपक्रमांसाठी टीम सुप्रीमोज नेहमीच सज्ज असते.



