मावळात आरएमके समूहाच्या ‘एनर्जी एन मोशन’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन!

मावळ मराठा न्यूज – वडगांव मावळ,मावळच्या औद्योगिक विकासाला नवी गती! आरएमके समूहाच्या इलेक्ट्रिक ट्रक निर्मिती प्रकल्पामुळे परिसरात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून सुमारे ४ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार असून, मावळच्या औद्योगिक प्रगतीत महत्त्वाची भर पडणार आहे.

आरएमके समूहाच्या ‘एनर्जी इन मोशन’चे उद्घाटन; मावळात चार हजार जणांना रोजगार,इंधनखर्चात होणार मोठी बचत -देवेंद्र फडणवीस “आरएमके समूह यंदा मावळ तालुक्यात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक ट्रकनिर्मिती आणि बॅटरी जोडणीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.तसेच स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरजही फडणवीस यांनी व्यक्त केली. सध्या प्रकल्पाची वार्षिक ट्रकनिर्मिती क्षमता पाच हजार असून, भविष्यात ती ५० हजारांपर्यंत वाढविली जाईल.आरएमके समूहाच्या ‘एनर्जी इन मोशन’ प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, आमदार जयंत पाटील, आरएमके समूहाचे अध्यक्ष रामदास काकडे, समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित काकडे, ‘एनर्जी इन मोशन’चे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मुरकुंबी, उत्पादन प्रमुख महेश केसरकर, माजी मंत्री बाळा भेगडे, विलास लांडे आदी उपस्थित होते. “गेल्या वर्षी २९ ऑगस्टला या प्रकल्पासाठी सामंजस्य करार झाला. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरातील चार्जिंगचा वेळ कमी करण्यासाठी बॅटरी बदलण्याची सुविधा उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बॅटरी अवघ्या सात मिनिटांत बदलून ट्रक पुन्हा वाहतुकीसाठी सज्ज करता येईल. भविष्यात महामार्गावर बॅटरी बदल केंद्रांचे जाळे उभारल्यास मालवाहतुकीचा वेळ कमी होण्यास मदत होईल. इलेक्ट्रिक वाहनांवरील सुरुवातीचा अतिरिक्त खर्च इंधनावरील बचतीतून सुमारे तीन वर्षांत भरून निघू शकतो.” आरएमके समूहाने शेतकऱ्यांना सहभागी करून जमिनीच्या एकत्रीकरणातून औद्योगिक वसाहत विकसित करण्याच्या पद्धतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यां प्रकल्पाचे कौतुक केले.बॅटरी बदल केंद्रांसाठी राज्य सरकार सर्वोतपरी सहकार्य करेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. “वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास डिझेल वर अवलंबून राहण्याचीक्षमता कमी होईल. त्यामुळे इंधनावरील परकीय चलनाचा खर्च आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सागितले.

मालवाहतूक क्षेत्रात क्रांती -शरद पवारमाजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत महत्वाच्या असल्याचे सांगितले. “इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास मालवाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते. औद्योगिक विकासासोबत स्थानिक रोजगार आणि परिसराच्या प्रगतीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

या प्रकल्पमुळे भविष्यातील चार्जिंग केंद्रे यातून स्थानिक युवकांना मोठी रोजगाराची संधी – सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी औद्योगिक गुंतवणुकीचा लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांच्या वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि उद्योग व स्थानिक परिसर यांच्यात समन्वय राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page