*परीक्षेतील यशासाठी अभ्यास हवा नियोजनबद्ध ;लोणावळा कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘मनशक्ती’तर्फे मार्गदर्शन*

मावळ मराठा न्यूज – लोणावळा,विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता कशी साधावी, तणावमुक्त राहून परीक्षेचे नियोजन कसे करावे आणि अभ्यासातून उत्तुंग यश कसे मिळवावे, याविषयीचे मौल्यवान मार्गदर्शन मनशक्ती केंद्र लोणावळा येथील प्रार्थना सभागृह येथे आयोजित विशेष कार्यशाळेत करण्यात आले. मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने या प्रबोधनात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत मनशक्ती केंद्राच्या जीवनदानी साधिका तसेच व्यवसायाने सनदी लेखापाल (CA) असलेल्या क्रांतीताई हुक्केरीकर यांनी उपस्थितांना अत्यंत प्रभावीपणे संबोधित केले. क्रांतीताई या मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून आदिवासी व ग्रामीण भागातील विविध उपक्रम, तसेच महिला व मुलांसाठी मार्गदर्शन सत्रांचे नियोजन व नेतृत्व करतात.आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना क्रांतीताई हुक्केरीकर यांनी सांगितले की, “अभ्यासातील सातत्य, वेळेचे अचूक नियोजन आणि मनाची एकाग्रता या त्रिसूत्रीच्या आधारे कोणताही विद्यार्थी परीक्षेच्या भीतीवर मात करून यश मिळवू शकतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करण्याच्या विविध सोप्या व वैज्ञानिक पद्धती समजावून सांगितल्या.या कार्यशाळेस महाविद्यालयातील ७५ हून अधिक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद उत्सुकतेने उपस्थित होते. परीक्षेच्या तोंडावर मिळालेल्या या मार्गदर्शनामुळे अभ्यास कसा करावा आणि वेळेचे नियोजन कसे आखावे, याविषयी स्पष्टता मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी, ही कार्यशाळा अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक ठरल्याचे समाधान विद्यार्थ्यांमधून व्यक्त करण्यात आले. महाविद्यालयाच्या शिक्षकवृंदाने मनशक्ती केंद्र व क्रांतीताई हुक्केरीकर यांचे या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page