गुरुकुल विद्यालयात पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविणे व रंगविणे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

मावळ मराठा न्युज- लोणावळा,गुरुकुल विद्यालयात पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविणे व रंगविणे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी विद्या विनय सभा गुरुकुल मराठी माध्यमाच्या प्रशस्त सभागृहात संपन्न झाला…या कार्यक्रमाकरिता विद्या विनय सभेचे विश्वस्त व माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे शाळेचे मुख्याध्यापक बयाजी खुरंगे पर्यवेक्षक सुजित सूर्यवंशी या स्पर्धेचे परीक्षक आदर्श कलाशिक्षक विनू पुनावाला निगडी शाळेचे आदर्श कलाशिक्षक विशाल केदारी ,श्री समर्थ कला केंद्र भांगरवाडीचे मूर्तिकार नकुल होजगे , मराठी उद्योजक सतीश वीर, शाळेचे कलाशिक्षक रमेश बोंद्रे , जेष्ठ शिक्षक रंगनाथ वरे व कुमार गरड उपस्थित होते.. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख १२०० , १००० , ७०० ,५०० व ३०० असे अनुक्रमे पाहिले ५ क्रमांकाची पारितोषिके संस्थेच्या वतीने देण्यात आली व उर्वरित पुढील ०७ क्रमांकावर असणाऱ्या मुलांना उत्तेजनार्थ रोख ३०० रुपये बापूलाल तारे कलाशिक्षक रमेश बोंद्रे व भूषण शिरुडे यांच्यावतीने देण्यात आली सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देखील देण्यात आले अध्यक्षीय भाषणात तारे सरांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नवनवीन कल्पना आपल्या शाळेमध्ये राबवल्या जातात म्हणून सर्व मुलांचे आणि कलाशिक्षकाचे विशेष कौतुक केले त्याचबरोबर विद्या विनय सभेचे अध्यक्ष दिनेश राणावत सर , सचिव सुरेशभाई पंसारी व कोषाध्यक्ष प्रदीप कैंया सर यांनी देखील मुलांचे कौतुक केले.मुलांना उत्कृष्ट पद्धतीने गणपती बनविण्याचे प्रशिक्षण बोंद्रे सरांनी दिले तसेच मुलांनी सध्याच्या काळात गणपती बनवण्याच्या कलेमध्ये झालेला आमूलाग्र बदल विचारात घेऊन मुलांनी नवीन कल्पना आपल्या मूर्तीत मांडल्या असे मत परिक्षक विशाल केदारी सर यांनी मांडले तर मुलांनी गणपती बनविताना मूर्तीचे सर्व भाग व्यवस्थित चिकटवून घ्या म्हणजे तुमची गणेश मूर्ती खूपच मजबूत व छान होईल तसेच बाप्पाचे बोलके डोळे कसे काढावे व रंगकाम करताना काय काळजी घ्यावी यावर योग्य मार्गदर्शन परिक्षक नकुल होजगे यांनी मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीनल पानसरे यांनी केले बक्षीस वाचन आणि कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी दीपक मावकर यांनी केली .पाहुण्यांचा परीचय दिनेश कुमार पाटील व भूषण शिरुडे यांनी करून दिला व आभाराचे गोड काम अथर्व गरुड यांनी केले.. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालकांनी कौतुक केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page