श्रेयस को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अभिनव उपक्रम,१० वीच्या विदयार्थ्यांची परीक्षा शुल्क भरून दिला मदतीचा हात

मावळ मराठा न्युज – पुणे,श्रेयस को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि.,नवी सांगवी, पुणे तर्फे इयत्ता १० वीत शिकणाऱ्या समाजातील गरजू व विशेष मुलामुलींना संस्थेच्या वतीने नवरात्री निमित्त विद्यावृत्तीच्या माध्यमातून सरस्वती पूजन करून एसएससी बोर्डाच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क अदा कार्यक्रम रविवार दिनांक ५/१०/२५ रोजी संध्याकाळी ठीक ६ वा श्री नामदेव शिंपी कार्यालय कसबा पेठ पुणे -११ या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सतीश अशोक मदने,उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर क्षीरसागर, सचिव श्री.योगेश देशमुख, खजिनदार श्री.सुधीर घाडगे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.शिक्षणासाठी गरजू विदयार्थ्यांना मदत करण्याचा कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.अश्या गरजू मुलांमुलींना यातून शिक्षणाची नवी ऊर्जा मिळत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page