गणेशनगर,जेष्ट नागरिक संघाच्या वतीने घोषणा व शपथ देऊन मतदान जनजागृती



मावळ मराठा न्युज :-थेरगाव येथे गणेश नगर जेष्ट नागरिक संघाच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी “जेष्ठ नागरिक संघ गणेशनगर थेरगाव येथे मतदार जन जागृती करतांना नगरपालिकेच्या दिव्यांग विभागातील सौ. वैशाली खरात, यांनी मतदान करणे,किती महत्त्वाचे आहे आणि पालिकेच्या जेष्ठ नागरिकां साठी काय सुविधा आहेत त्याबद्दल माहिती दिली. जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे यांनी नागरिकांना आव्हान केले की ,आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका. मतदान सर्वश्रेष्ठ काम.आपलं मत, विकासाला मत.तुम हो महान ,करके मतदान. ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर,मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो,मतदानाची किंमत नाही घेणार पण मतदान मात्र जरूर करणार,अशा प्रकारच्या घोषणा देऊन उपस्थित नागरिकांना मतदान करण्याची शपथ दिली. सुभाष चव्हाण म्हणाले की,आपल्याला शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग फिरण्यासाठी,व मौज मजा ,किंवा भटकंती न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून महाराष्ट्राची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी नगरपालिकेच्या दिव्यांग विभागातील सौ. वैशाली खरात,अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, श्रीमती कुमुदिनी घोडके, राजेंद्र परदेशी, नामदेव शेकोकर,प्रमोद वाळणकर ,सुभाष चव्हाण, कृष्णा कळसकर, नरेंद्र जोशी, दिलीप टिंगरे, घारे ईश्वरदास , गोरे बापू, लोहार वसंत,अमृते सदानंद ,पेटकर,ठाकरे पिसे रामचंद्र, उपस्थित होते.pअध्यक्ष विष्णूपंत तांदळे यांनी आभार मानले.




