कुरवंडे हद्दीपर्यंत विजेचे खांब लावावेत आणि वलवण बापदेव मंदिर येथे गटर बांधण्यात यावे -सूर्यकांत वाघमारे

मावळ मराठा न्युज- लोणावळा,कुरवंडे येथिल लोणावळा नगर पालिका हद्दी पर्यंत विजेचे खांब लावणे बाबत सचिव महाराष्ट्र प्रदेश आरपीआय (आठवले) आणि माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेकवेळा निवेदन देऊन,सर्व पक्षीय दणका मोर्चा काढून केली होती. कारण कुरवंडे गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट जंगल आहे त्यामुळे कुरवंडे गावाकडे जाणा-या ग्रामस्थाना वन्यप्राणी व इतर मद्यपी चोरट्यांपासून जिवितास धोका होऊ शकतो अशा अनेक घटना यापूर्वी देखिल घडलेल्या आहेत. त्यानुसार नगर पालिकेच्या वतीने प्रशासकिय ठराव करण्यात आलेला आहे तसेच इस्टीमेट देखील तयार करण्यात आलेले असून त्याची रक्कम रू. चाळीस लाख (रू.४०,००,०००/-) इतकी होत आहे.पालिका पुढे काही करत नाही यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना सदर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.तसेच वलवण येथे बापदेव मंदिर परिसर व पावसाळी पाणी रस्त्यावर येत असल्याने अनेक अपघात होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी गटर बांधणे अतिशय महत्वाचे आहे सदरचा रस्ता वर्दळीचा असल्याने पावसाळी व मंदिर परिसारातून रस्तावर येणारे पाणी हे गटारा मध्ये सोडल्यास आपघात टाळता येतील तरी या अत्यंत महत्वपूर्ण समस्या निवारणासाठी गटर बांधणे आवश्यक आहे अशी मागणी वाघमारे यांनी लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी आणि प्रशासक यांचेकडे निवेदनद्वारे केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page