लोणावळ्यातील परफेक्ट इंजीनीयरींग प्रायवेट लिमीटेड कंपनीत १ ,६४ ,५०० /- रु किंमतीचा कच्चा मालाची चोरी करणाऱ्या तिघांना अटक

मावळ मराठा न्युज-लोणावळा,दि.०९/०८/२०२६ रोजी दुपारी ३ .५६ वा चे पुर्वी परफेक्ट इंजीनीयरींग प्रायवेट लिमीटेड कंपनी मौजे १६४०००/- कच्चा मालाची चोरी करणाऱ्या तुंगार्ली लोणावळा ता. मावळ जि पुणे येथे एकूण १ ,६४ ,५०० /- रु किंमतीचा कच्चा मालाची चोरी करणाऱ्या याच परफेक्ट इंजीनीयरींग प्रायवेट लिमीटेड कंपनी मौजे तुंगार्ली लोणावळा ता. मावळ जि पुणे येथे पूर्वी काम करणाऱ्या कामगार नामे १) रुपेश शिवराम फाटक, वय ४२ वर्षे, रा. रोहीदास वाडा कार्ला ता. मावळ जि पुणे. २) मनोज कुमार निसाद वय. २५ वर्षे, रा. नारायणी धाम जवळ तुंगार्ली लोणावळा ता. मावळ जि पुणे मो. व इसम नामे ३) जयहिंदकुमार बलंन प्रसाद, वय. ३३ वर्षे, रा. पांगोळी लोणावळा ता. मावळ जि पुणे यांनी कंपनीतील कच्या माल चोरी केला असुन त्यांचे विरुद्ध जयंतीलाल ताराचंद ओसवाल, वय. ५७ वर्षे, धंदा व्यवसाय रा.२५९ भवानी पेठ पुणे यांनी तक्रार केली आहे.भारतीय न्याय संहिता ३०६ ,३ (५) कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शन खाली गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा खोपडे/२४७५ हे करीत आहेत. दाखल अंमलदार पोो सुर्यवंशी/१६७३

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page