लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजच्या वतीने गरीब लहान मुलांना स्वेटर,हिवाळी जॅकेट वाटप








मावळ मराठा न्यूज-लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज,माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेशजी अगरवाल,लायन्स सदस्य,मित्र आणि शुभचिंतक,लोणावळा सुप्रीमोज टीमने लोणावळा येथील झोपडपट्टीतील गरीब लहान मुलांना नुकतेच स्वेटर,हिवाळी जॅकेट वाटप केले. तसेच हे स्वेटर मौला अली अनाथाश्रमातील अनाथ मुलांना दान केले,रायवुड,लोणावळा हे स्वेटर,हिवाळी जॅकेट,साधू वासवानी मेडिकल सेंटर,खंडाळा चे लाल अडवाणी यांनी प्रायोजित केले होते. गेल्या आठवड्यात,लोणावळा सुप्रीम टीमने वाटप केले होते. क्लब अध्यक्ष पीएमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांच्या समन्वयाने लोणावळा सुप्रीम टीमने नेहमीच उदात्त कार्यासाठी प्रयत्न करत राहिली आहे.



