ग्रुप ग्रामपंचायत मुंढावरे मधील मुंढावरे,वळक, वाडीवळे या जिल्हा परिषद तिन्ही शाळांना ISO प्रमाणपत्र;मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेमार्फत शाळांचा सन्मान


मावळ मराठा न्युज – मावळ,आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मावळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मुंढावरे मधील मुंढावरे,वळक, वाडीवळे या जिल्हा परिषद तिन्ही शाळांना ISO प्रमाणपत्र झाल्याबद्दल मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेमार्फत उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद सदस्य श्री संतोष गबळू राऊत मा सभापती श्री गुलाबराव महाळसकर यांच्या हस्ते तिन्ही शाळांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुंढावरे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री रोहिदास वाघमारे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री.दीपक गायकवाड, सदस्य श्री अमोल थोरात, ग्रुप ग्रामपंचायत मुंढावरे चे सदस्य श्री अमोल थोरवे, मुख्याध्यापक श्री बाळासाहेब चोरगे,श्री. बन्सीलाल कोल्हे,श्रीम. हेमलता मोरे,सौ हेमलता गायकवाड, सौ शोभा इंगळे,सौ रेश्मा अडसूळ उपस्थित होते.. ग्रामसेवक श्री. परमेश्वर गोमसाळे व सरपंच सौ. राणीताई जाधव यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.



