कै.सौ कमलिनी पुरुषोत्तम परांजपे स्मृती पुष्प २०२६ अंतर्गत २५ एप्रिल रोजी अवतरणार गंधर्व युग

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे दि. १३ – कै.सौ कमलिनी पुरुषोत्तम परांजपे स्मृती पुष्प २०२६ अंतर्गत सूरगंधर्व पं. सुरेश साखळकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त आणि त्रिवेणी फेम सुप्रसिद्ध गायक पं. विनोद भूषण आल्पे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार आणि गंधर्व युगाचा मागवा घेणारा विशेष नाट्य संगीताचा कार्यक्रम “देणे गंधर्व युगाचे” सादर होणार आहे. शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कै. डॉ. शं.वा. परांजपे नाट्य संकुल, कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात बालगंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व, देवगंधर्व यांच्या सांगीतिक वैभवाचा वेध संपदा थिटे, पं आल्पे आणि पं. साखवळकर आपल्या गायनातून सादर करणार आहेत. संजय गोगटे, माधव मोडक आणि सुरेश कुलकर्णी त्यांना साथ संगत करणार आहेत. अशी माहिती कार्यक्रम प्रमुख मंगेश राजहंस, अध्यक्ष विनायक अभ्यंकर कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे यांनी दिली. कार्यक्रम विनामूल्य आहे. रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे संगीत विभाग प्रमुख लीना परगी यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page