*”कलापिनीत घडतेय सुसंस्कारित पिढी”-सुप्रिया शिंदे*

मावळ मराठा न्यूज -तळेगाव दाभाडे,”हल्लीच्या काळात आईवडिलांना आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळ नसतो. पण कलापिनी सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करते. हे कौतुकास्पद आहे. इथे चालणारे विविध उपक्रम स्तुत्य आहेत. कलापिनीला माझ्याकडुन कायमच सहकार्य राहील.” असे मत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उप मुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी व्यक्त केले. कलापिनी सांस्कृतिक केंद्र, तळेगाव दाभाडे आयोजित फोर्ब्स फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेल्या विद्युत जनित्र संचाचा उद्घाटन सोहळा आणि कलापिनी महिला मंच आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा नवरात्रौत्सव विशेष नवदुर्गा सन्मान सोहळा नुकताच कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समारंभासाठी फोर्ब्स फाउंडेशनच्या अधिकारी बिना जोशी, सुनीता कुवळेकर , कलापिनीचे कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान अश्या मृणाल कुलकर्णी, अर्चना काटे, मानसी भावसार, निर्मला जाधव, रमी गुडगेरी, स्नेहलता साठे, सीताबाई चोपडे, अनघा कुलकर्णी,अमृता पाटोळे या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. विविध गुणदर्शनांत “दुर्गे दुर्गटभारी” या आरतीवर मीरा भरड हिने नृत्य सादर केले. सुचेता कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी जोगवा आणि गोंधळ सादर केला. ” देवी अष्टभुजा” स्तोत्रावर देवीची विविध रूपे सादर केली. अमृता पाटोळे हिने तलवार बाजी आणि लाठी काठी ही विविध स्वरूपातील प्रात्यक्षिके सादर झाली.फोर्ब्स फाउंडेशनच्या जोशी म्हणाल्या, “आमच्या कंपनीला कलापिनीला थोडे सहकार्य करता आले हे आमचे भाग्यच आहे.” सुनीता कुवळेकर म्हणाल्या, “कलापिनिशी आमचे जवळचे नाते आहे. त्यामुळे या संस्थेला मदत करताना विशेष आनंद झाला”. कार्यक्रमात कलापिनीच्या पहिल्या विद्युत जनित्राची उभारणी ज्यांनी केली त्या रमेश थिटे, मंदार थिटे, महेश सोनपावले, केदार अभ्यंकर यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. अनंत परांजपे यांनी आत्तापर्यंत कलापिनीच्या उभारणीत ज्यांचा ज्यांचा सहभाग होता त्या सगळ्यांच्या बद्दल माहिती सांगून.. कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे यांनी केले तर उपाध्यक्ष अशोक बकरे यांनी आभार मानले.सचिव हेमंत झेंडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना परगी,ऋचा पोंक्षे आणि राखी भालेराव यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page