*कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना “समाजरत्न” पुरस्कार*

मावळ मराठा न्युज -दि. २५.०७.२०२६,पिंपरी चिंचवड शहरामध्ये शाहुनगर येथील आमदार अमित गोरखे यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार २०२६ सामाजिक क्षेत्रात धार्मिक , कला , क्रिडा , सांस्कृतिक , शैक्षणिक , पर्यावरण , राजकिय , आरोग्य , उद्योग , साहित्यिक , अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनिय सामाजिक कार्य केल्या बद्दल सर्वोत्कष्ट समजला जाणारा ” जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२६ ” कासारवाडीचे सुपुत्र , समाजसेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व , कामगार भुषण पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानिय प्रमुख पाहुणे नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी एकुण २२ जणांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक सुनील साठे यांनी केले प्रस्ताविका सुनीता लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन लतींद्र भिंगारे यांनी केले. आमदार अमित गोरखे या सर्वांचे कौतुक करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या .यावेळी पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page