शासकीय काम बारा महिने थांब,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नि परिसर सुशोभीकरण काम प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ठप्प

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसर सुशोभीकरण काम पुन्हा रखडले, कारण काय तर गेली २० दिवस पालिका प्रशासनाकडून स्टक्टचर डिझाईन मिळाले नाही म्हणून. शासकीय काम बारा महिने थांब,अशी म्हणायची वेळ येते. प्रशासनाने असाच उशीर केला तर सदर काम ३०० दिवसात कसे पूर्ण होणार? ठेकेदाराला दोष देण्यात काहीच अर्थ नाही वेळेत काम पूर्ण होइल का?असा प्रश्न निर्माण होतो आणि प्रशासनाची विश्वासहार्यता यावर सामान्य नागरिक विश्वास ठेवायला कचारतो.सुशोभीकरण कामासाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरचे काम हे मे. ग्रीनलॅन्ड कंपनीकडून करण्यात येत आहे. कामासाठी ३०० दिवसांची मुदत आहे. या ३०० दिवसात सदरचे काम मंजूर नकाशे प्रमाणे पूर्ण करायचे आहे. या कामाला २२ जून रोजी सुरुवात करण्यात आली.परंतु प्रशासनाकडून स्टक्टचर डिझाईन मिळाले नाही म्हणून गेले २० दिवसापासून काम ठप्प झाले आहे.मागील अनेक वर्षांपासून या पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामासाठी लोणावळा नगरपरिषदेने ठराव केल्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे काम सुरू झाले नव्हते. तीन महिन्यांपूर्वी या कामासाठी आवश्यक असणारा निधी व तांत्रिक मंजुरी या कामाला मिळाली होती. मावळचे आमदार सुनील शेळके माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या पाठपुराव्यातून १९ फेब्रुवारी २०२४ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.या साठी निखिल कवीश्वर यांनी देखील प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page