जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी उर्फ सीबी यांच्या ८२ व्वा वाढदिवस संगीतमय संध्याने साजरी,अनेक मान्यवरांची हजेरी

लोणावळा : लोणावळा शहर पत्रकार संघाचेसंस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी उर्फ सीबी यांचा अभिष्टचिंतन सोहळा महिला मंडळ हॉल लोणावळा येथे कौटुंबिक पद्धतीने संगीतमय आपल्या मित्रपरिवार स्नेही त्यांचेवर प्रेम करणाऱ्या मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आयुष्याची ८२ वर्ष त्यांनी लोणावळाकरांना खूप काही दिले आहे त्यांना आपण छोटासा आनंद देऊ या ज्यांनी आम्हा सर्वाना कलाकार म्हणून ओळख निर्माण करून दिली असे भावनिक उद्गार बापूलाल तारे यांनी काढले. सी बी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्वर संगम प्रस्तुत गाणी मनातली हा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला . या कार्यक्रमात हार्मोनियम दस्तूर खुद्द ८३ वर्षांचे चंद्रकांत जोशी यांनी वाजविले. जोशी हे उत्तम हार्मोनियम व पेटी वादक आहेत. तसेच उत्तम गायक देखील आहेत. अतिशय स्पष्टोक्ते व सडेतोड लिखान करणारे जोशी काका यांनी प्रशासनाच्या विरोधात व समाजाच्या हिताचा बाजूने लिखाण करत जनजागृतीचे काम त्यांचे साप्ताहिक मावळ टाइम्सच्या माध्यमातून एक जबाबदार संपादक म्हणून केले आहे. २००२ साली त्यांनी लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.त्यावेळी १२, १३ साप्ताहिके लोणावळ्यात प्रकाशित होत होती. त्यावेळी १२, १३ संपादकांना एकत्रित करून आपल्या शहरासाठी चांगले काय देता येईल याबाबत त्यांनी नेहमी आपल्या सहकारी यांना मार्गदर्शन केले आहे.लोणावळा नगरपरिषदेत प्रशासकीय दांडगा अनुभव असल्याने नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमी प्राधान्य दिले.त्यांच्या या कार्याचा आढावा घेण्यासोबत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बापू तारे व त्यांचे सहकारी, व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अनेक संगीत प्रेमी रसिक तसेच त्यांचेवर निश्चिम प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी हजेरी लावत जोशी यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला . लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या घरगुती परंतु भरगच्च कार्यक्रमाने जोशी काका भारावून गेले होते त्यांनी सर्व उपस्थित्यांचे मनापासून आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page