लोणावळ्यात ज्येष्ठ गायकांनी सादर केला अस्सल मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम८७ वर्षांच्या आजींनी गायले ‘रेश्माच्या रेघांनी’ रसिकांनी दिली उत्स्फूर्त दाद

मावळ मराठा न्युज -लोणावळा,संगीताला वयाचे बंधन नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत सूर साधना गायन क्लासेसच्या ज्येष्ठ कलाकारांनी अस्सल मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. महिला मंडळ हॉल, लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लावणीची धमाल आणि गीतांची कमाल’ या कार्यक्रमात ६० ते ८७ वयोगटातील ज्येष्ठ गायकांनी एकापेक्षा एक ठसकेबाज लावणी गीते आणि मराठी गाणी सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.सूर साधना गायन क्लासेसचे शिक्षक प्रदीप वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून हा कार्यक्रम पार पडला. विशेष आकर्षण ठरले ते ८७ वर्षांच्या आजींनी सादर केलेले ‘रेश्माच्या रेघांनी’ हे लावणी गीत. आपल्या उत्स्फूर्त सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांना अक्षरशः अचंबित केले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीत हे केवळ मनोरंजन नसून आनंद, उत्साह आणि विरंगुळ्याचे प्रभावी माध्यम आहे. दैनंदिन जीवनातील चिंता, व्याधी आणि दुःख काही काळ बाजूला ठेवून ही ज्येष्ठ मंडळी गाण्यात रमून जातात. याच उद्देशाने प्रदीप वाडेकर हे ज्येष्ठ नागरिकांना संगीताच्या माध्यमातून आनंद देण्याचे काम करीत आहेत.या कार्यक्रमात पुरुषोत्तम पाटील, उज्वला पाटील, दिलीप पवार, पांडुरंग बोराडे, सुलभा लांबट, शोभा दिघे, शोभा मांढरे, शारदा अगरवाल, प्रतीक्षा महाडिक, प्रेमा गुप्ता, शारदा भांबुरे, संगीता नाईक, उषा बोरसकर, सुनील पाणगावकर आदी ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे निवेदन डॉ. ममता काळे यांनी केले.या कार्यक्रमाला लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, माजी नगराध्यक्षा हेमलता अगरवाल, माजी उपनगराध्यक्षा सिंधुताई कवीश्वर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी, जयवंत नलावडे, डॉ. संदीप डोबले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मृदुला पाटील, संध्या गव्हले, राजेश मेहता, राष्ट्रवादी महिला आघाडी लोणावळा अध्यक्षा उमा मेहता, शत्रुघ्न खंडेलवाल, डॉ. अगरवाल, नील राईलकर, बीना राईलकर, सुनील म्हस्के, अनिल बांदल, सुरेखा वाडेकर, विशाखा गोळपकर, डॉ. कविता नयर, श्रिया रहाळकर, प्रिया देसाई, मंगला राणे, सविता परदेशी यांच्यासह अनेक रसिक प्रेक्षक उपस्थित होते.ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या सुरांना मिळालेली रसिकांची दाद, हेच या आगळ्यावेगळ्या संगीत सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य ठरले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page