लोणावळ्यातील उद्योजक नितेश मुरलीधर जाधव यांची ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी नियुक्ती






मावळ मराठा न्युज- लोणावळा, लोणावळ्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री. नितेश मुरलीधर जाधव यांची “विशेष कार्यकारी अधिकारी” पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून सर्वाना परिचित असलेल्या श्री.नितेश जाधव यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्या सर्व मित्रपरिवार आणि लोणावळा परिसरात आनंदाचे वातावरण व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकुशलतेचा या पदाच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांना लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उद्योजक श्री. नितेश मुरलीधर जाधव यांची “विशेष कार्यकारी अधिकारी” पदी नियुक्ती झाल्याने त्यांचेवर सगळ्या थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



