लोणावळ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खर्गे यांनी केलेल्या कथित असंसदीय व अशोभनीय वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा







मावळ मराठा न्युज -लोणावळा, दिनांक २७ ऑक्टोबर,२०२६ भारतीय जनता पार्टी,लोणावळा नाणे मावळ मंडळच्या वतीने दिनांक: २७ ऑक्टोबर २०२६ लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या कथित असंसदीय व अशोभनीय वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी काँग्रेस पक्ष १२ वर्षे सत्तेपासून दूर असल्यामुळे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची बिहार च्या कार्यकर्ता मेळावा मध्ये बोलताना जीप घसरल्याची टीका या निषेध मोर्चा मध्ये सहभागी वक्त्यांनी केली. यावेळी भारतीय जनता पार्टी,लोणावळा नाणे मावळ मंडळचे अध्यक्ष अनिल दगडू बुवा गायकवाड, भारतीय जनता पार्टी, लोणावळा नाणे मावळ मंडळ महिला आघाडी अध्यक्ष परिजा राजेश भिलारे,माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,बाळासाहेब जाधव,भगवान तनवानी,प्रफुल काकडे,युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष माऊली गुंड,अमित गंधे,विद्या फर्नांडिस,मिलिंद काका खळदकर, हर्षल होगले, संतोष जंगले, सचिन ठोकरीया, अनिल खिल्लारे,प्रसाद पुरेकर, योगेश गोसावी,मुकुंद घनवट,चारूताई कमलवार,स्मिता भिलारे,पार्वती रावळ,अदिती होगले,मुक्ता गव्हाणे,महिला आघाडी सर्व मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



