*लोणावळ्यातील कैवल्यधाम च्या “गोर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालय” चा अमृत महोत्सव उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा*

मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळ्यातील जागतिक ख्याती असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेतील “गोर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालय” अमृत महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे उपराष्ट्रपती सन्मानीय श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वंदे मातरम”, राष्ट्रीय गीत आणि महारष्ट्र गीताने करण्यात आली यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय श्री जिष्णु देव वर्मा, कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी, माजी केंद्रीय मंत्री आणि कैवल्यधाम ग्लोबल चे अध्यक्ष सन्मानीय श्री सुरेश प्रभू कैवल्यधाम नियामक मंडळाचे सभासद सन्मानीय श्री राकेश सेक्सारिया उपस्थित होते.यानंतर शांतीपाठ करण्यात आला आणि उप राष्ट्रपर्तीच्या हस्ते कैवल्यधाम संस्थेचे संस्थापक परमपूज्य स्वामी कुवलयानंद जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री सुबोध तिवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि सन्मानीय उप राष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त स्वरुपात परिचय करून दिला. यानंतर सन्मानीय उप राष्ट्रपती यांना श्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तसेच आणि सन्मानीय राज्यपाल श्री सुबोध तिवारी यांच्या शुभ हस्ते कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा,शंख आणि योग प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.यानंतर श्री राकेश सेक्श्रीया यांनी आपल मनोगत व्यक्त केल. या प्रसंगी भारताचे उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम योग संस्थेचे आदरणीय अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी यांच्या “Yoga Explained LEARN FROM THE MASTER” या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.श्री सुरेश प्रभू, राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी उपस्थितांना संबोधले. या कार्यक्रमास कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, गोर्धनदास सेक्सरिया योग महावि‌द्यालयातील शिक्षकव वर्ग आणि वि‌द्यार्थी, कैवल्य विद्या निकेतन शाळेचा शिक्षक वर्ग, तहसीलदार, पोलीस अधिकारी, आय.एन.एस. शिवाजी चे अधिकारी, लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कैवल्यधाम संस्थेच्या गोर्धनदास सेक्सरिया योग महावि‌द्यालयातील एम.ए. योग शास्त्र दुसऱ्या सत्राचे वि‌द्यार्थी श्री वैभव सिंग यांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम राष्ट्रगीत आणि ओम पूर्ण मद मंत्राने करण्यात आली.सायंकाळी योग महावि‌द्यालयातील वि‌द्यार्थानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते.हा कार्यक्रम कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोणावळा नगरपरिषद, टाटा पॉवर हाउस लोणावळा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लोणावळा विभाग तसेच लोणावळा शहर पोलीस यंत्रणा यांचे विशेष सहकार्य लाभले.१९५१ मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस हे योग शिक्षणासाठी समर्पित जगातील पहिले महावि‌द्यालय होते. १९६२ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने या संस्थेला अखिल भारतीय उच्च शिक्षण संस्था (All India Institute of Higher Education) म्हणून मान्यता दिली. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील पहिली योग संस्था ठरली. गेल्या ७५ वर्षांत या महाविद्यालयाने शिक्षक आणि संशोधकांच्या अनेक पिढ्‌यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कैवल्यधामच्या पद्धती ६५ हून अधिक देशांमध्ये पोहोचल्या आहेत.हे महाविद्यालय कैवल्यधामच्या अंतर्गत कार्यरत आहे. स्वामी कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये स्थापन केलेले कैवल्यधाम हे योगाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी समर्पित जगातील पहिले प्रयोगशाळा-केंद्र होते. त्यानंतर संस्थेने ४७ समवयस्क परीक्षित (peer-reviewed) संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. तसेच, योगावरील जगातील पहिले समवयस्क परीक्षित नियतकालिक असलेले ‘योग मीमांसा’ हे गेल्या शंभर वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होत आहे. कैवल्यधामच्या उपक्रमांमध्ये शैक्षणिक शिक्षण, निवासी आरोग्य व कल्याण उपचार कार्यक्रम, वैज्ञानिक संशोधन आणि समुदाय-केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे.कैवल्यधाम ही महाराष्ट्रातील लोनावळा येथे स्वामी कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये स्थापन केलेली योग संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. येथे १९५१ मध्ये स्थापन झालेले गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस, जगातील पहिले योग महावि‌द्यालय, कार्यरत आहे. ही संस्था वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक शिक्षण, निवासी आरोग्य व कल्याण कार्यक्रम आणि समुदाय-केंद्रित उपक्रम यांचा समन्वय साधते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने तिला Scientific and Industrial Research Organization म्हणून मान्यता दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page