गायिका आशिका आणि अभिनेत्री कुंदनाणी यांचा पिंपरीत सत्कार

मावळ मराठा न्यूज, पिंपरी(प्रतिनिधी) पिंपरी सिंधी समाजाच्या वतीने पिंपरी येथील नवोदित गायिका/ अभिनेत्री आशिकी कुंदनानी यांचा छोटे नवाब साई छोटुराम यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच रांझणा व्हिडिओ अल्बमच्या संगीतकार/ गझल गायिका डॉ.रितू जोहारी,दिग्दर्शक सुमित रंजन,छायाचित्रकार गुरमीतसिंग सोढी,गीतकार रिया जोहारी यांचे देखील विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी रांझणा व्हिडिओ अल्बमचे निर्माते रवी कुंदनाणी,भाजप च्या पिंपरी कॅंप विभाग प्रमुख जयेश चौधरी, उद्योजक खुबचंद मंगतानी,सोनू मंगतानी,लक्ष्मण धर्मानी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी साई छोटूराम म्हणाले कि, चांगल्याची संगत लाभल्यास चांगले गुण अंगी उतरतात. उदयोन्मुख गायिका आशिका हि सत्संगाच्या माध्यमातून देखील गायनसेवा करीत आहे.भक्तांनी साईबाबांवर श्रध्दा ठेवली तर आयुष्यात सबूरीने चांगलेच घडेल.अशा शब्दांत आशीर्वाद दिले.गायिका आशिका कुंदनाणी म्हणाल्या कि, राजस्थानमध्ये शूटिंग केलेल्या रांझणा गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भविष्यात फ्रॅग्रेंस ऑफ लव नावाचा गीत लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश चौधरी यांनी तर आभार रवी कुंदनाणी यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page