लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात शिवजयंती साजरी




मावळ मराठा न्यूज:- लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय शाळा क्र.६ , गवळीवाडा, लोणावळा शाळेमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिवव्याख्याते सतीश साठे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच छत्रपतींच्या जीवनावर व प्रसंगांवर आधारित चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. शाळेत पालक मातासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिव आरतीने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी लोणावळा नगरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष सुधीर शिर्के, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई टेलर, माजी नगरसेवक दिलीपदादा लोंढे, श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महादूतात्या गवळी, सुतार गुरुजी, शिवदुर्ग मित्र परिवार उपस्थित होते तर खेळ रंगला पैठणीचा या माता पालकांच्या कार्यक्रमासाठी लोणावळा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा श्रीराम नागरी पतसंस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सिंधु कवीश्वर, श्रीराम नागरी पतसंस्थेच्या माजी चेअरमन निलम कडू व गवळीवडा परिसरातील इतर महिला पालक उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी होऊन जिंकलेल्या माता पालकांना पहिल्या तीन क्रमांकांसाठी पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा तांदळे व सहकारी शिक्षक अमोल साबळे, मनीषा सरवदे, शीतल येणारे यांनी सहकार्य केले.




