किन्हई गावात नवरात्र उत्सव मंडळ तसेच कुलस्वामिनी महिला मंच आयोजित होमिनिसटर



मावळ मराठा न्यूज़ :-मावळ, (शिल्पा राहुल भुंडे): नवरात्र उत्सवाचे आवचित्य साधुन कुलस्वामिनी महिला मंच मावळच्या संस्थापिका सौ. सारिका सुनिलआण्णा शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ आयोजित करण्यात आला.यामध्ये किन्हई गावातील सर्व मंडळांच्या माध्यमातून दिमाख्दार कार्यक्रम साजरा करण्यात आला . कुलस्वामिनी महिला मंच यांच्या मार्फत विजेत्या भगिनींना प्रथम क्रमांक पैठणी, दुसऱ्या सोन्याची नथ , तिसऱ्या चांदीचे पैंजण , चौथ्या क्रमांक सुवर्णदिप तसेच पाचवा क्रमांक अष्टलक्ष्मी मातेचे चांदीची फ्रेम इ. बक्षिसे ठेवण्यात आली. तसेच किन्हई गावातील महिलांनी मावळचे लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी थोडा आनंदी वेळ घालवता यावा यासाठी कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांनी खुप सुंदर उपक्रम राबवला ,यामध्ये महिलांना लकी ड्रॉ मार्फत निवड करून विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या. सर्व महिलांनी स्वतःला यामध्ये संपूर्ण झोकुन देवून मनसोक्त आनंद लुटला.तसेच आमदारांचे स्वयंसेवक आकाश शेंडगे यांने देखील प्रत्येक मंडळास स्वःताला झोकुन देऊन कार्यक्रम यशस्वी केला .




