लोणावळा व्यापारी संघटनेच्या वतीने अन्न सुरक्षा बाबत जनजागृती शिबीर संपन्न

मावळ मराठा न्युज:- लोणावळा अन्न सुरक्षा बाबत जनजागृती करणे साठी अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र शासन आणि अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण,नवी दिल्ली (FSSAI) ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने लोणावळा व्यापारी संघटना,लोणावळा ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशिक्षण शिबिर नुकतेच संचेती लॉन येथे आयोजीत करण्यात आले.सदर प्रशिक्षण शिबिरात व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणत सहभाग घेतला. प्रशिक्षण शिबिर करीता पुण्या वरून महिला अधिकारी आल्या होत्या.सदर प्रशिक्षण शिबिर यशस्वी करीता लोणावळा व्यापारी संघटने चे अध्यक्ष श्री दिलीप रामकिशोर गुप्ता यांनी नियोजन केले.यासोबतच श्री तरुण खंडेलवाल,किराणा व्यापारी संघटना अध्यक्ष श्री सुरेश श्रीश्रीमाळ, डिस्ट्रीब्युटर असोसिशनचे अध्यक्ष श्री संतोष अगरवाल ह्यांनी प्रशिक्षण शिबिर यशस्वी होणे करीता विशेष मेहनत घेतली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page