तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांचेवर गुन्हा दाखल,ड्रंक अँड ड्राईव्ह,दोन गाड्या धडक



मावळ मराठा न्युज :-तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी दोन कारला टक्कर दिली असून ही घटना तळेगाव दाभाडे शहरात काका हलवाई दुकानासमोर आज दुपारच्या सुमारास घडली.पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील कार चालवत होते त्यांनी तळेगाव ते तळेगाव स्टेशन यादरम्यानच्या मार्गावरून जात असताना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काका हलवाई दुकानात जवळ आल्यानंतर त्यांनी दोन कारला पाठीमागून धडक दिली.अपघात झाल्यानंतर मुख्याधिकारी पाटील घरी गेले. त्यांना आणण्यासाठी काही पोलीस कर्मचारी गेले. परंतु, पाटील यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रायन्नावर हे पोलिसांचा अधिकचा फौजफाटा घेऊन पाटील यांच्या घरी गेले. त्यानंतर पाटील यांनी दरवाजा उघडला. पोलीस पाटील यांना ताब्यात घेतले आणि ठाण्यात घेऊन आले.मुख्याधिकारी पाटील यांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. मद्यपान चाचणी करण्यासाठी पिंपरीतील वायसीएमएच रुग्णालयात नेण्यात आले आहे.हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत, असेही पोलीस उपायुक्त बांगर यांनी सांगितले.याबाबत सिद्धराम इरप्पा लोणीकर वय ३७ , रा. नढेनगर, काळेवाडी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्याधिकारी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांनी मद्यपान केल्याची लोणीकर यांची तक्रार आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..




