‘जागर स्त्रीशक्तीचा सूर गृहलक्ष्मीचा’, रंगली आकुर्डीत स्वर मैफिल

मावळ मराठा न्युज :-आकुर्डी,दिनांक २० जुलै,मैफल -गणेश देशपांडे व स्वरा मुजिकल्स आयोजित व ज्योती गोराणे यांची संकल्पना असलेला तसेच शामजी गोराणे यांचे संगीत संयोजन असलेला ‘जागर स्त्रीशक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा ‘ हा भक्ती गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर छोटे नाट्यगृहात संपन्न झाला. ज्योती गोराणे, गणेश देशपांडे, अँड.शोभा कदम ,भक्ती कापसे, यांनी आपापल्या शैलीने उत्कृष्ट गायन सादर केले तर गौरी वनारसे यांचे संबळ वादन, तर लक्ष्मी कुडाळकर यांचे ढोलकी वादनाने रंगत आणली,तर भक्ती कापसे यांनी हार्मोनियमची साथ दिली, प्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे यांचे यमन रागातील मेडली ने कार्यक्रमाला स्वरसाज चढविला. विठ्ठल आवडी प्रेमभाव, नाम घेता तुझे, फुलले रे क्षण माझे, झिनी झिणी बजे बिन, पाऊस पहिला जणू कान्हुला, देवाचीये द्वारी, अशा एकापेक्षा एक सरस भक्ती व भावगीताने संपूर्ण सभागृह भक्तीमय झाले होते. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. महिलांच्या या कला कौशल्याला, त्यांच्या स्त्री शक्तीला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रसिध्द तबला वादक शामजी गोराणे यांचे तबला वादनाने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले, सत्यजित सराफ, (की बोर्ड) ओंकार ढवळे, व शशांक शितोळे (ऑक्टोपॅड) यांची विशेष संगीत साथ लाभली. श्रद्धा वरणकर यांनी आपल्या माफक शब्दफेकिने निवेदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page