लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र १ ते शाळा क्र १० या शाळेतील विद्यार्थांचा क्रीडा,बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धाचा बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा,नुकताच लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र १ ते शाळा क्र १० या शाळेतील विद्यार्थांचा क्रीडा स्पर्धा ,बौद्धिक स्पर्धा , व सांस्कृतिक स्पर्धा यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शाळा क्र १ मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी मा .प्रशासन अधिकारी श्री अशोक पानसरे,शिक्षण विभागाचे कारकून सिद्धार्थ धारके उपस्थित होते त्याच प्रमाणे खंडाळा,गवळीवाडा व शाळा क्र. १ शाळेतील माजी आदर्श विदयार्थी,सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गवळी वाडा शाळेचे माजी विद्यार्थी योगेश जाधव, शीतल जाचक,पूनम कचरे,खंडाळा शाळा माजी विद्यार्थी सुरेश गायकवाड,मंगेश खराडेशाळा क्र १ चे माजी विदयार्थी पुरंदरे हायस्कुलचे मुख्याध्यापक आनंद गावडे हे देखील यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुचेता एखे ,प्रास्ताविक सौ. ज्योती चव्हाण यांनी तर आभार श्रीमती नंदा तांदळे यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page