पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व अधोरेखित करण्यासाठी कृषी विभागामार्फत पाककला स्पर्धा

मावळ मराठा न्यूज:- पुणे,मकर संक्रांती – भोगी या सणाच्या दिवशी पौष्टिक तृणधान्य युक्त पदार्थांचा आहारामध्ये वापर करण्याची राज्याची परंपरा, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे मिलेट ऑफ मंथ संकल्पनाचे औचित्य साधून, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र -शासन, कृषी -विभाग यांनी कृषी आयुक्तालय पुणे येथे सेंट्रल बिल्डिंगच्या परिसरात ‘मकर संक्रांती – भोगी’ हा दिवस राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिवस’म्हणून पुणे येथे दिनांक १३ /१/२०२३ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यामध्ये बाजरीपासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती , यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून महिला व पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती बाजरी पासून तयार करून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आपण कल्पना करू शकत नाही इतक्या सर्व प्रकारच्या बाजरी पासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा पाककला स्पर्धेत समावेश होता.खूप छान व स्वादिष्ट पदार्थांचा त्या ठिकाणी सर्वांनी आस्वाद घेतला. आणि बाजरी पासून इतके सगळे पदार्थ एवढ्या छान प्रकारे तयार करता येतात आणि चवीबरोबरच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारी बाजरी हे तृणधान्य याचे आरोग्यात किती महत्त्व आहे याबाबत माननीय आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सखोल मार्गदर्शन केले .या स्पर्धेमध्ये लोणावळा येथील सौ. छाया केतन सावला यांनी गुजरात स्पेशल बाजार मुठिया , बाजरा केक, नानकटाई , बाजरा मठ्ठा हे बाजरी पासून बनवलेले रुचकर व स्वादिष्ट पदार्थ स्पर्धेसाठी तयार करून आणले व परीक्षकांच्या पसंतीस उतरवून त्यांना माननीय आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाने प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल सौ छाया सावला यांचे खूप खूप अभिनंदन ! यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी वडगाव मावळ श्री. दत्तात्रय पडवळ साहेब, मंडळ कृषी अधिकारी खडकाळा श्री वसंत मोरे साहेब व कृषी सहाय्यक लोणावळा श्रीमती. मनीषा दगडखैर यांचे मार्गदर्शन लाभले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page