बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी खुशविंदरसिंग धालीवाल माननीय न्यायालयाकडून फरार घोषित







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६६/२०२५ IPC कलम ३७६ (२) (N). या गुन्हया मधील पाहीजे असलेला आरोपी नामे खुशविंदरसिंग गुरूदर्शनसिंग धालीवाल वय ४५ वर्षे, रा. पनवाहा बुटीक स्ट्रीट ०२, विजय नगर, मोगा रोड, कोटकपुरा फरिदकोट,पंजाब-१५१२०४ मो. क्र. ७८१४३८ ५५४० सदर फोन स्वीच ऑफ असून यांच्या विरूध्द इकडील पोलीस स्टेशनला वरील प्रमाणे गुन्हा ता.१८/६/२०२५ रोजी २०.५५ वाजता दाखल आहे. यातील आरोपीचा त्यांच्या राहते पत्यावर शोध घेतला असता तो मिळुन आला नसुन सदर ठिकाणी तो वास्तव्यास नाही. त्याअनुषंगाने सदर आरोपी यांच्या विरूध्द मे. वडगांव मावळ कोर्ट यांनी प्रोकलीमेशन वारंट जारी केले आहे. यातील वरील आरोपी हा लोणावळा खंडाळा व आजु बाजुच्या परिसरात वेष बदलुन वास्तव्य करीत आहे अशी खात्रीलायक गोपनीय बातमी आहे. त्याप्रमाणे आरोपी यांच्या बद्दल कोणास काही माहित असल्यास त्याबाबतची माहिती श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री.सुर्यकांत वाणी मोबाईल नंबर ७५८८९९७७११ यावर कळविणेस विनंती आहे. माहिती देणाराचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.



