पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवीत धार्मिक,आद्यात्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम व पथनाट्य सादरीकरणातून प्रबोधन

मावळ मराठा न्युज -नवी सांगवी,शनी मंदिर परिसर व महालक्ष्मी मंदिर रोड तसेच शनि मंदिरापासून जाणारा सैन्य दलाचा रस्ता व मोकळे मैदान परिसरातील स्वच्छता करण्यात आली . ह प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी म्हणाले की, आरोग्य विभाग व बेसिक्स टीमने विशेष जनजागृती स्वच्छता मोहीम गेल्या तीन दिवसापासून राबवीत असून यापुढेही राबविण्यात येईल. सैन्यदलाच्या मोकळ्या जागेत हजारो कबुतरांना नागरिक अन्नधान्य टाकतात मा.न्यायालयाने प्रतिबंध केला आहे तरी नागरिक अन्न धान्य टाकतात म्हणून आमच्या विभागाच्या वतीने सकाळपासून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.नागरिकांनी अन्नधान्य व पाणी न टाकण्याचे आव्हान मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांनी केले आहे.यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सहभाग नोंदवला. मंदिर परिसर व इतर कुठेही मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर नागरिकांनी कचरा व निर्मल्य टाकू नये,आपला परिसर आपणच स्वच्छ केला पाहिजे.जीबीएस (गुइलेन बँरे सिड्रोम) आजार आपल्या शहरात हातपाय पसरतांना आपण पाहतोय त्यासाठी परीसर स्वच्छ ठेवून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहनही जोगदंड यांनी केले.यावेळी आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे म्हणाल्या की रस्त्यावर कचरा व पक्षांना उघड्यावर टाकणाऱ्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे आणि यापुढे करणार आहोत.जीबीएस आजाराविषयी अभियाना नंतर त्यांनी आजाराची होउ नये म्हणून माहिती दिली.अभियानानंतर  बेसिक्स टीमच्या वतीने पटनाट्य घेण्यात आले.शिवप्रसाद पासलकर, प्रेम आवटी,अनिकेत शिंदे यांनी सहभाग नोंदवला.यावेळी ह प्रभागाचे क्षेत्रिय आधिकारी महेश वाघमोडे ,मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी ,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे,   सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे,मुकादम विनोद कांबळे ,अरुण जगताप ,कविता गोयल, सा.का.ज्ञानेश्वर वाडेकर,बेसिक्स टीम झोनल इन्चार्ज धीरज फणसे , इन्चार्ज सुनील धावरे,दीपा गराडे, पवन रंधे,जयश्री आरणे,सुशांत साळवे,साहेब सूर्यवंशी ,अशा गायकवाड.प्रिती कोरी,संतोष शेळके, गणेश तारडे,दिपक मिसाळ पुजा जाधव,रोहित सुरवशे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page