भाजपाने मला नगराध्यक्ष पदासाठी पाठींबा द्यावा – सूर्यकांत वाघमारे

मावळ मराठा न्युज -लोणावळा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे नगराध्यक्ष पद अनुसुचित जाती साठी आरक्षित झाले आहे आरक्षण जाहीर होण्या पूर्वी लोणावळा शहरातील तसेच मावळ तालुक्यातील अनेक मान्यवरांनी मी निवडणुक लढवली पाहिजे त्या दृष्टीकोनातून सक्रिय पाठींबा जाहीर केलेला होता त्याच प्रमाणे आरक्षण पडले आणि अनेकांनी मला प्रत्यक्ष्य व अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि बळ वाढले त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आलो शहरातील वातावरण राजकिय दृष्टया सकारात्मक असतांना मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो नाहीतर माझ्या विषयी शहरात आणि तालुक्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकते गेली अनेक वर्ष लोणावळा शहराच्या हितासाठी असणाऱ्या मोर्चे आंदोलनात माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे त्यामुळे माझ्या विषयी लोणावळा शहरात सहानभूतीचे वातावरण आहे या सगळ्या चा विचार करता मी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी सोबत मैत्री करून अनेक निवडणुका लढविल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये भाजपा शिवसेनेला शंभर टक्के पाठीबां दिला रिपब्लिकन पक्षाने एक ही जागा लढविली नाही पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये भाजपाशी मैत्री करण्या अगोदर वडगावचे जेष्ठ पत्रकार विजय मोरे यांनी निवडणुक लढविली त्यावेळी भाजपाचे राजू आगळे यांचा विजय झाला आणि मावळ पंचायत समिती मध्ये भाजपाचा प्रवेश झाला आरपीआय ने केंद्रियसामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री भारत सरकार मा.ना. रामदास आठवले साहेब यांनी शिवशक्ती भिम शक्ती चा धाडसी प्रयोग केरून महाराष्ट्रात महायुतीला जन्म दिला त्यानंतर भाजपा शिवसेना यांनी एकमेकाशी फारकत घेतली त्यावेळी रिपब्लिकन पक्षाने भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मावळ तालुक्यात आरपीआय भाजपाशी युती करेल असा निर्णय घेण्याची हिम्मत केली आणि गेली .१५ वर्षा पासून आम्ही भाजपा सोबत आहोत तत्पूर्वी ‘लोणावळा नगर पालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणुक लागली त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी मा .सुरेखा जाधव यांना तीन वेळा वलवण गावच्या उमेदवार म्हणून पाठींबा दिला व मतदान केले विधान सभेच्या निवडणुकी मध्ये माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांच्या पाठीशी तीन वेळा खंबीरपणे उभा राहीलो ! पंचायत समिती च्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी आरपीआय ने भाजपाला मोलाची साथ दिली कामशेत ची सभा आज हि निष्ठावंत भाजपाच्या स्मरणात असेल प्रचंड पडणारा पाऊस सर्वत्र काळोख केंद्रियमंत्री नितीन गडकरी साहेब पुण्याची सभा आटपून कामशेतच्या सभेला येणार होते वक्ते संपत आलेले होते त्यामुळे प्रचंड जनसमुदायाला थांबवून ठेवण्याचे फार मोठे आव्हाण होते आशी वेळी मी बाजी प्रभू देशपांडे सारखी खिंड लढवली होती त्याच मुळे विधान सभेचे वारे फिरले बाळा उर्फ संजय भेगडे काही स्वकीयांच्या मुळे अडचणीत सापडले होते पराभवाच्या छायेत होते प्रचंड पावसात झालेली सभा त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली आम्ही भाजपा उमेदवारांच्या पाठीशी प्रत्येक वेळी सोबत उभा राहीलो आज मला मदत साथ देण्याची वेळ आलेली आहे मी भाजपा कडे आद्याप कोणत्या च पदासाठी मागणी अथवा आग्रह धरलेला नव्हता स्वताहून मला कोणतेच पद आणि मदत अशी भाजपाकडून काहीच झालेली नाही आता मला मदत करण्याची वेळ आलेली आहे म्हणून लोणावळा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा शिवसेना व मित्र पक्षाने मला जाहीर पाठींबा द्यावा अशी नम्र विनंती मा. नगराध्यक्ष लोनपा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती मा. सभापती शिक्षण मंडळ .लोनपा सूर्यकांत वाघमारे यांनी केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page