पिंपरी चिंचवड शहराचे पैलवान काळुराम लांडगे कोल्हापूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित








मावळ मराठा न्युज -कोल्हापूर, दि.०२.१०.२०२५,येथे राजर्षी शाहु स्मारक भवन येथे नुकत्याच झालेल्या महात्मा गांधीजी जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमा मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देश निर्मितीमध्ये खूप मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पुढाकाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते नेहमी सर्वसामान्य, उपेक्षित माणसाच्या बाजूचा विचार करत असत. खेड्याकडे चला ही त्यांची खूप महत्त्वाची घोषणा होती. आजच्या काळात महात्मा गांधीजी यांच्या विचाराची अतिशय गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी केले.
ते महात्मा गांधीजी नवविचारमंच यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना जेष्ठ पुरोगामी शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले, महात्मा गांधीजी देशाची गरज आहेत. आज गांधी विचारच प्रतिगामी शक्तींना रोखू शकतात. माझा सन्मान हा गांधी विचारांचा सन्मान आहे.
गोव्यातील जेष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. श्रीकृष्ण अडसूळ म्हणाले, महात्मा गांधीजींचे विचार ध्येयनिष्ठ होते. सामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यांच्या नावाचा पुरस्कार सर्वांना मिळणे हा गांधीवादी पुरस्कार्थींचा सन्मान आहे.
प्रकाशक अनिल म्हमाने म्हणाले, गांधी व्यक्ती नसून विचार आहे. गांधी विचारांना कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते संपत नसतात. कारण गांधी विचार भारतीयांच्या मनामनात, नसानसास दडलेले आहेत. त्यामुळे गांधी विचार आजही जीवंत आहेत.
ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सत्तर हजार रुपयांचा चेक यावेळी दिला तसेच या कार्यक्रमाचे अवचित्त साधून कासारवाडी येथील पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानचिन्ह , मानपत्र व गांधी टोपी देऊन सर्वोत्तम समजला जाणारा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगारी करत असल्यामुळे त्यांना ” महात्मा गांधीजी राष्ट्रीय पुरस्कार २०२५ ” वरील मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला यावेळी २४ जणांन पुरस्कार देण्यात आले.
प्रा.टी.के.सरगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सुत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर तर माणचेकर यांनी आभार मानले यावेळी पुरस्कार्थी , नातेवाईक व नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती.



