वंदे मातरम” या राष्ट्रमंत्राला १५० वर्षें पूर्ण,यानिमित्त ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोणावळ्यात भव्य दिव्य कार्यक्रमाबाबत बैठक संपन्न

मावळ मराठा न्युज-लोणावळा,”वंदे मातरम” या गीताला १५० वर्षें पूर्ण होत आहे या निमित्त लोणावळ्यात दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात आज आज सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हॉटेल संचेती लॉन्स या ठिकाणी बैठक संपन्न झाली.भारत देशातील लाखो देश भक्तांनी हसत हसत वंदेमातरम म्हणत भारत भूमीला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिले.वंदेमातरम म्हणजे फक्त एक काव्य नसून स्वातंत्र्याचा स्वाभिमानी,अभिमानी ज्वलंत राष्ट्र मंत्र आहे.या राष्ट्रमंत्राला १५० वर्षें होत आहे यानिमित्त लोणावळ्यात पुढील सर्व पिढ्याना वंदेमातरम या राष्ट्रमंत्राचा इतिहास सांगता यावा यासाठी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात लोणावळ्यातील सर्व शाळांचे जवळपास ५ ते ७ हजार विद्यार्थी हे वंदेमातरम गीत सामूहिकरित्या गाऊन एक नवीन विक्रम करणार आहे. यात ५०० हुन अधिक शिक्षक,खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र लोणावळा शहर पोलीस आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन देखील सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम लोणावळा नगरपरिषद,हिंदू समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसर,शिवसेवा प्रतिष्ठान,मावळ वार्ता फौंडेशन आणि इतर सामाजिक संस्था यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरूप म्हणजे वंदेमातरम गीत याबद्दलचा इतिहास सांगणारे प्रसिद्ध वक्ते यांचे व्याख्यान त्यानंतर सामूहिक वंदेमातरम या राष्ट्र गीतगान,सहभागी शाळांना सन्मान पत्र सन्मान चिन्ह वितरण अश्या या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. या संदर्भात लवकरच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.या बैठकीत सर्व शाळांचे प्रतिनिधी,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. आनंद गावडे,बापूलाल तारे,धनंजय चंद्रात्रे,प्रमोद देशपांडे,आदींनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page