अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता सन्मान सोहळाथाटात संपन्न







मावळ मराठा न्युज-मुंबई ८६ वर्षाची देदिप्यमान परंपरा असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता सन्मान सोहळा मुबंई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार,ज्येष्ठ विचारवंत,अर्थतज्ज्ञ,डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला.यावेळी राज्य अध्यक्ष मिलिद आष्टिवकर,विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे मन्सूरभाई आदी विश्वस्त,पदाधिकारी आणि राज्यातून आलेल्या पत्रकार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मधुकर भावे यांना तर ज्येष्ठ नाट्यकर्मी विशेष सन्मान सिनेअभिनेते भरत जाधव यांना प्रदान करण्यात आला.मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा आदाटे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी आचार्य अत्रे स्मृती संपादक पुरस्कार महेश म्हात्रे यांना देण्यात आला.तसेच पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिजित कारंडे,अमेय तिरोडकर,पांडुरंग पाटील, दिनेश केळुसकर,श्रीमती सीमा मराठे,बाळासाहेब पाटील,श्रीमती शर्मिला कनगुटकर आणि पुण्याचे भरत निगडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ नरेंद्र जाधव,शरद पवार,मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पत्रकारांच्या समस्यांचा पाढा शरद पवार यांचेपुढे मांडल्या.




