लोणावळा महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्यूज,लोणावळा:- “भारतीय संविधानात नमूद केलेले नागरिकांचे हक्क व मूलभूत कर्तव्य लोकशाही विकासासाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता कर्तव्याचे पालन होणे गरजेचे आहे.”

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे, डी.बी. एन.पी.कला, एस.एस.जी.जी. वाणिज्य आणि एस.एस.ए.एम. विज्ञान, आणि कला.वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,वलवन लोणावळा येथे संपन्न झालेल्या संविधान दिवस कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय लांडगे यांनी वरील विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा.संजय साळुंके यांनी संविधान सभा निर्मितीचा इतिहास सविस्तर सांगितला तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.दिगंबर दरेकर उपस्थित होते तसेच उपप्राचार्य डॉ. विलास पाटील आणि प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संजय साळुंके तर आभार प्रदर्शन प्रा.संदीप लबडे यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page