ABP Majha या चॅनलने “माझा सन्मान” या पुरस्कारासाठी ज्यांची निवड केली त्या उल्का महाजन यांनी हा पुरस्कार नम्र पणे नाकारला कारण जाणून घ्या…

मावळ मराठा न्युज :-उल्का महाजन यांनी Abp माझाला जे कारण कळवलं ते कारण अत्यंत महत्त्वाचं आणि एखादा पुरस्कार मिळावा म्हणून लाळघोटेपणा करणाऱ्या सर्वांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचं होतं.उल्का महाजन यांना एबीपी माझा ने “माझा सन्मान” हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्याचं ठरवलं होतं.हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला जाणार आहे हे आदरणीय उल्का महाजन यांना ज्यावेळी समजलं त्यावेळेला उल्का महाजन यांनी पुरस्कार घोषित करणाऱ्या Abp माझा या न्यूज चॅनलला खालील उत्तर देत कळवलं की…. ” ज्या पद्धतीने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता हे विद्यमान सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींच्या हस्ते (ते संविधानिक पदावर असले तरीही) सन्मान स्वीकारणे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटणारे नाही. म्हणून सदर सन्मान मी नम्रपणे नाकारत आहे!”Broadcast//

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page